Tuesday, 5 May 2009

विषाद

ग्रामीण भारत शहरी झाला
धोतर बंडी टोपी ऐवजी बुश शर्ट पँट वापरू
लागला
लाल माती जाउन डाम्बर आल
आयुष्याचे चाक भरभर पळू लागल
बैलगाड्या गेल्या
अन मोटरी धावू लागल्या
मोकळी मैदाने गायब झाली
मॉल्स वर गर्दी वाढू लागली -

काकरव हल्ली कोणी ऐकतच नाही
उगवत्या सुर्याला कोणाचे अर्घ्यच नाही
आपल्या
शेतात सोने उगवणारा उपाशी
त्याच्या जिवावर इतर खातात तुपाशी
सुबत्ता वाढली
पण मने घुसमटली - २

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली
जाती पातीं मधील दरी अधिकच रुन्दावलि
अन स्वतःला मागास म्हणुन घ्यायची
जणू स्पर्धाच लागली
माणसे कमी अन मेंढरं वाढीस लागली - ३

जीवनाबद्दल पुस्तके लिहिताना
माणूस पुस्तकी जीवन जगु लागला
विमुक्त स्वच्छंदी जीवन
चार भिंतींच्या दिनक्रमात विसरून गेला - ४

असे का घडते कळत नाही
कसे बदलावे उमजत नाही
घटनांचा वेग प्रचंड वाढला आहे
पण त्याचा ब्रेक सापडत नाही - ५

- पिनाकिन कर्वे
५ मे २००९