Thursday 30 April, 2009

डोळ्यातील पाणी

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आरसा असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
अचानक सतावणारया धूलिकणांची कचकच असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
आळसावलेल्या डोळ्यातील झोप असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
गार वारा वाहताना बोचणारी थंडी असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
काटा बोचाल्यावर होणारी वेदना असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
अपमान होता रागाची थरथर असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
देवाला घातलेली साद असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
आई च्या मायेची सावली असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
प्रियजन भेटल्यावर येणारे आनंदाचे उधाण असते -

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
प्रेयसीच्या प्रेमाची पावती असते - १०

डोळ्यातील पाणी हे फक्त पाणी नसते
रात्रीच्या एकांतातली विरहाची जाणीव असते - ११

- पिनाकिन कर्वे

शोध

दिवस मागुन दिवस, जंगलातून फिरताना
प्राणी पक्षी फुलपाखरे अन्
मुंग्यांचा रांगा दिसतात
कितीही वाट पाहिली तरी मुंग्यांची रांग संपत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

संह्याद्रित भटकताना
वाटा मिळतात, दरया दिसतात, गिरिशिखरांना पाय भिडतात
पण क्षितीजाचा थांग लागत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

हिमालायाचा देवभुमित नवे साहस करताना
अथंगा दरीतुन आकाशाला भिडणारया वाटा दिसतात
पण कितीही चढले तरी आकाशाला पाय भिडत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

तारे दिसतात, नक्षत्रे दिसतात , त्यांच्या राशि सुद्धा बनतात
एवढच काय, भरलेल्या आकाशात मंदशा चमकणारया
अनेक आकाशगंगा सापडतात
तरी विश्वाचा थांग लागत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

हा 'मी' आला कुठून अन् चालला कुठे
बाहेरून आला का जन्मच इथे
कशासाठी आला अन् राहतो कुठे
प्रश्नांचा शोध काही संपत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

- पिनाकिन कर्वे

भटक्या

आठवड्याभराच्या कामानंतर शनिवार येतो
थकलेल्या मनावर एक जादू करतो

दबलेल्या इच्छा उफाळून
बाहेर येतात
कल्पनांना नवीन धुमारे फुटतात

झाडांची सळसळ , पक्ष्यांची किलबिल

बाहेरून येते एक साद
मन चुकता देत प्रतिसाद

भटकंतीचे सामान धूळ झटकून बाहेर पडत
मळखाऊ कपडे चढ़वून मन उडायला तयार होत

आता उन, वारा, थंडी, पाउस कशाचीही तमा नसते
कानामध्ये फक्त संह्याद्रिची साद असते ,
संह्याद्रिची साद असते

- पिनाकिन कर्वे

गरुड

उंच उंच घेत भरारी
शीळ घालतो जणू एक तुतारी
दाही दिशा त्याच्या पंखात
पसरली दहशत या रानात

तीक्ष्ण नजर, ताकदवान झेप
एक क्षणात, गणित जुळते एक

डोळ्यांची उघडझाप होते होते
बळकट पंजांची पकड एक जीवावर पड़ते

कलकलाट फडफडाट
जंगलात अचानक गड़बड़ उडते
अन् एका जीवाची वावटळ मालवते

जो सुटला त्याची मजा
अडकलेल्याला चोचीची सजा

कोणी निंदा कोणी भजा
पण शेवटी हा पक्ष्यांचा राजा

- पिनाकिन कर्वे
३० डिसेम्बर २००८