Thursday, 30 April 2009

शोध

दिवस मागुन दिवस, जंगलातून फिरताना
प्राणी पक्षी फुलपाखरे अन्
मुंग्यांचा रांगा दिसतात
कितीही वाट पाहिली तरी मुंग्यांची रांग संपत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

संह्याद्रित भटकताना
वाटा मिळतात, दरया दिसतात, गिरिशिखरांना पाय भिडतात
पण क्षितीजाचा थांग लागत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

हिमालायाचा देवभुमित नवे साहस करताना
अथंगा दरीतुन आकाशाला भिडणारया वाटा दिसतात
पण कितीही चढले तरी आकाशाला पाय भिडत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

तारे दिसतात, नक्षत्रे दिसतात , त्यांच्या राशि सुद्धा बनतात
एवढच काय, भरलेल्या आकाशात मंदशा चमकणारया
अनेक आकाशगंगा सापडतात
तरी विश्वाचा थांग लागत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

हा 'मी' आला कुठून अन् चालला कुठे
बाहेरून आला का जन्मच इथे
कशासाठी आला अन् राहतो कुठे
प्रश्नांचा शोध काही संपत नाही
अन् 'मी' मला सापडत नाही

- पिनाकिन कर्वे

1 comment:

Saya Karve said...

Pinakin's poem is a genuine reflection of every young mind. It proves the depth of the poet's thoughts and the spread of his experience.